मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है: संजय राऊत

0

दि.27: मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरामधून भाजपावर (BJP) खोचक टोले लगावले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या दोन अडीच वर्षांपासून शिवसेना-भाजपात (Shivsena-BJP) आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, टोमणे-प्रतिटोमणे असा कलगीतुरा सुरूच आहे. अजूनही रोजच त्याचे नवनवे अंक पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा टोलेबाजी सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या आपल्या सदरामध्ये चंद्रकांत पाटलांच्या याच विधानावरून त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. तसेच, ही चमचेगिरी असल्याचं म्हणत त्यावर टीका देखील केली आहे.

“मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है”

“मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है” असं म्हणत संजय राऊत यांनी रोखठोक सदरामधून खोचक टोले लगावले आहेत. “देशाचे पंतप्रधान मोदी चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान झाले आहेत. काँग्रेसच्या काळात चमचे होते. मोदी काळात अंधभक्त आहेत. फक्त नामांतर झालं. काम तेच”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “देवकांत बरुआ यांनी इंदिरा इज इंडिया म्हटलं होतं, मोदी भक्तांनी मोदी इज इंडिया असं जाहीर केलंय. जे मोदींबरोबर नाहीत, ते देशाबरोबर नाहीत, असं टोक भक्तांनी गाठलंय”, असं देखील राऊत यांनी या लेखात नमूद केलं आहे.

अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवत

चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या एका विधानाचा संदर्भ घेऊन संजय राऊतांनी त्यांच्यावर आणि भाजपावर खोचक टोलेबाजी केली आहे. “महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील यांनी आता कडेलोट केला आहे. पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवत सांगितलं नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात आणि फक्त दोनच तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पाटलांची ही विधानं ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना इतकं मानसिक बळ येतं कुठून? हा संशोधनाचा विषय आहे”, असा खोचक सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here