Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांचं नथुराम गोडसे बाबत मोठं विधान

0

मुंबई,दि.३०: Sanjay Raut On Nathuram Godse: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नथुराम गोडसे बाबत मोठं विधान केले आहे. नथुराम गोडसे हा खरा हिंदुत्ववादी असता तर त्याने महात्मा गांधी यांच्याऐवजी मोहम्मद अली जिना यांच्यावर गोळी झाडली असती, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. आज महात्मा गांधीजी यांनी पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी एका हिंदुत्ववाद्याने आजच्याच दिवशी महात्मा गांधी यांच्यावर गोळी झाडल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

“जर कुणी खरा हिंदुत्ववादी असता तर त्यानं जिन्नांना गोळी घातली असती. गांधींना का मारलं?. जिन्नांनी पाकिस्तानची मागणी केली होती. ज्यांनी देशाचं विभाजन केलं आणि पाकिस्तानची मागणी केली म्हणजेच जिन्ना यांना गोळी घातली पाहिजे होती. जर तुमच्यात हिंमत होती तर जिन्ना यांना गोळी घातली असती. ते एक देशभक्तीपर कृत्य ठरलं असतं. एका फकिराला गोळी घालणं ठिक नव्हतं. त्यांच्यावरील हल्ल्याचा आज जगभरात निषेध होतो. त्याचं दु:ख आज संपूर्ण जगाला आहे”, असं संजय राऊत म्हणाले. 



आम्हीही अनेकदा महात्मा गांधी यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. पण महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले होते. त्यांनी भारतीयांमध्ये कायदेभंग, सत्याग्रह आणि अहिसेंच्या माध्यमातून लढण्याचा विश्वास जागृत केला. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान आहे. आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांचे योगदान नाकारत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.





काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘हिंदुत्ववादी’ शब्दाचा वापर करून महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक खास ट्विट केलं. “एका हिंदुत्ववाद्यानं महात्मा गांधी यांना गोळी घातली होती. आज सर्व हिंदुत्ववाद्यांना वाटतं की गांधीजी राहिले नाहीत. पण जिथं सत्य आहे तिथं आजही बापू जिवंत आहेत”, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. याच ट्विटबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी जिन्ना यांना गोळी घातली असती तर तो खरा हिंदुत्ववादी ठरला असता असं रोखठोक विधान केलं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here