संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ केला शेअर म्हणाले, रात्रीस खेळ चाले

0

मुंबई,दि.13: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे मतदान आज (दि.13 मे) होत आहे. राज्यात मतदान असलेल्या ठिकाणी भाजपकडून पैशांचे वाटप करण्यात आले. त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे आरोप नसून हे सर्व उघडपणे दिसत आहे. 

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता त्यांनी यावर मोठे दावे केले आहेत. नाशिक आणि कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पोलिसांना उचलताना नाकीनऊ येतील एवढ्या वजनाच्या बॅगा आणल्या होत्या, त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, कुठे त्यातील पैसे वाटले गेले याचे व्हिडीओ लवकरच बाहेर आणू असा दावा राऊत यांनी केला आहे. 

मात्र, निवडणूक आयोगा आणि सर्व तपास यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधून बसल्या आहेत, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांना ऐन उन्हाळयात कितीही पैशांचा पाऊस पाडू द्या, नरेंद्र मोदी यांचा पराभव निश्चित आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

आमच्या गाड्या, हेलिकॉप्टर तपासण्यात येते. आमची झाडाझडती घेता, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी करण्यात आली. सांगलीत आमच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर तपासण्यात आले. नाकाबंदी करण्यात येते. मात्र, नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपचे मंत्री, मुख्यमंत्री मोठ्या बॅगा खोके नेते आहेत. त्यांची तापसणी कोणी करायची, असा सावलही राऊत यांनी केला. निवडणूक आयोगाला हे दिसत नाही काय, त्यांच्या डोळ्यावर झापड आले काय, आमचे फोन रेकॉर्ड करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस महासंचालिका गॉगल लावून बसल्या आहेत काय, असा सवाल त्यांनी केला. 

आमच्या गाड्या, हेलिकॉप्टर तपासण्यात येते. आमची झाडाझडती घेता, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी करण्यात आली. सांगलीत आमच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर तपासण्यात आले. नाकाबंदी करण्यात येते. मात्र, नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपचे मंत्री, मुख्यमंत्री मोठ्या बॅगा खोके नेते आहेत. त्यांची तापसणी कोणी करायची, असा सावलही राऊत यांनी केला. निवडणूक आयोगाला हे दिसत नाही काय, त्यांच्या डोळ्यावर झापड आले काय? असा सवाल राऊत यांनी केला.  

रात्रीस खेळ चाले

नाशिकमधला मुख्यमंत्री यांच्या आगमनाचा एक व्हिडिओ मी ट्विट केला. दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत. 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या. त्या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटत गेले, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकर देत आहोत, असे राऊत यांनी जाहीर केले.  

बारामतीत अजित पवार यांच्या नियंत्रणातील बँका रात्रभर पैसे वाटपासाठी सुरू होत्या. निवडणूक आयोगाला हे दिसत नाही काय, असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. त्या नऊ बॅगांमध्ये काय होते. त्या बॅगांमधून सुमारे 12 ते 15 कोटी रुपये नाशिकमध्ये उतरवण्यात आले. त्यानंतर विविध ठिकाणी त्याचे वाटप झाले. याबाबतचे पुरावे आम्ही देणार आहोत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here