मुंबई,दि.4: संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने मध्यरात्री अटक केली होती. सायंकाळी 5.30 पासून त्यांची ईडी कार्यलयात चौकशी सुरू होती. यानंतर आता त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती.
संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. सक्तवसुली संचालनालयाने 6 दिवसांसाठी संजय राऊत यांची कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना केलीय.
संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने आज पुन्हा एकदा कोठडी 10 ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली. परंतु संजय राऊत यांचे वकील ॲड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. परंतु कोर्टाने त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली