Sanjay Raut On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.1: Sanjay Raut On Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. संख्याबळ जास्त असूनही भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले व स्वतः सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्षाच्या आदेशामुळे ते सरकारमध्ये सहभागी झाले.

देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत. आता दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. नव्या सरकारला कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही. शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा, असंही राऊत म्हणाले.

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासंदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्यांच्या पक्षात वरिष्ठांचे आदेश पाळण्याची परंपरा आहे. पक्षादेश पाळावा लागतो, आम्हीही पाळतो, तोच त्यांनीही पाळला, असं राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here