संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा उल्लेख करत मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.18: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरी जात त्यांच्या गणपतीचे दर्शन घेत आरती केली. याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. 

लोकशाहीत पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांची अशाप्रकारे भेट घेणे अयोग्य आहेत. सरन्यायाधीशांसमोर अनेक महत्त्वाचे राजकीय खटले सुरू आहेत. असे असताना पंतप्रधानांनी त्यांच्या घरी जाणे आणि भेट घेणे अयोग्य आहे. यावरून पंतप्रधान मोदी यांच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसते, असेही संजय राऊत म्हणाले.

सरन्यायाधीशांनी या खटल्यांपासून दूर व्हावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरी जात गणपतीची आरती करतात. हे कायदा आणि राजकीय शिष्टाचाराविरोधात आहेत. संविधान अशाप्रकारच्या घटनांना परवानगी देत नाही. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येतात. पंतप्रधान मोदी देशातील जनतेला मूर्ख समजत आहेत काय, पण जनता मूर्ख नाही. सरन्यायाधीशांसमोर अनेक महत्त्वाचे राजकीय खटले सुरू आहेत. तसेच आता पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांचे मधूर संबंध जनतेसमोर आले आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांनी या खटल्यांपासून दूर व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसून येत आहे.

न्यायव्यवस्थेबाबत शंका 

या संबंधांमुळे आता आम्हाला न्याय मिळण्याची आशा नाही. त्यावर फक्त तारख पे तारीख सुरू आहे. राज्यात बेकायदा सरकार सत्तेत असताना फक्त पुढची तारीख मिळत आहे. आता कदाचित सरन्यायाधीश निवृत्तीनंतर यावर भाष्य करतील, असेही राऊत म्हणाले. आम्हाला न्यायालयात न्याय मिळाला नाही तरी आम्हाला जनतेच्या न्यायालयात नक्की न्याय मिळेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. जनताही आता न्यायव्यवस्थेबाबत शंका उपस्थित करत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here