Sanjay Raut On Navneet Rana: संजय राऊत यांचे नवनीत राणा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान

0

अमरावती,दि.18: Sanjay Raut On Navneet Rana: संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणूक प्रचार करताना अनेकवेळा बोलण्याची मर्यादा ओलांडली जाते. बळवंत वानखेडे यांच्याविरोधात नाचीची नाही, तर देशाची लढाई आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच तुम्हाला बाई खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे असंही म्हटलं आहे.  

Sanjay Raut On Navneet Rana: नवनीत राणा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान

संजय राऊत यांनी नाव न घेता नवनीत राणांवर केली आहे. “ही लढाई देशाची आहे. ही लढाई बळवंत वानखेडे विरोधात नाची अशी नाही. आमची लढाई बबली सोबत नाही. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अशी आहे,” असे राऊत म्हणाले.  

संजय राऊत म्हणाले, “तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे. बाई तुम्हाला प्रेमाने बोलावेल पण तुम्ही मोहाला बळी पडू नका. आपण सावध राहिलं पाहिजे. डोळा मारला की जायचं नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे”. ज्या बाईने मातोश्रीचा अवमान केला आणि मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला तिचा पराभव करणं हे आमचं प्रथम काम आहे, असेही राऊत म्हणाले. 

सौ दाऊद एक राऊत

“छाताडावर मोदी नावाचा जो राक्षक बसला आहे, त्याला खाली ओढण्यासाठी नवनीत राणाचा पराभव केला पाहिजे. मला लोक उगाच मनात नाहीत, सौ दाऊद एक राऊत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here