मुंबई,दि.३०: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “आता आपले मार्ग वेगळे आहेत, उत्तम विरोधक म्हणून काम करू” असे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधानसभा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळलं आहे.
आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे का? त्यांना धुणीभांडीच करावी लागणार आहेत, असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लागवला आहे.
ईडीच्या चौकशीला सामोलं जाणार
उद्या दुपारपर्यंत ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार, मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे, असं संजय राऊत म्हणाले
माझ्या शुभेच्छा
ज्यांना सरकार पाडून दाखवण्याचं कंत्राट मिळालं होतं. त्यांनी ते पाडून दाखवलं. आता त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसंच ठाकरे परिवाराला सत्तेची लालसी कधीच नव्हती. पवारांनी विनंती केली म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आज जे विरोधात बोलत आहेत त्यांच्यापैकी अनेकांचं पालन पोषण शरद पवारांच्या नेतृत्त्वात झालं आहे.