Sanjay Raut On Kirit Somaiya: शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केला गंभीर आरोप

0

मुंबई,दि. १८: Sanjay Raut On Kirit Somaiya: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नवीन खळबळजनक आरोप केला आहे. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली याच्यावर हे लोक काही बोलत नाहीत. त्यावर भाजपच्या लोकांनी बोललं पाहिजे. भाजपच्या दबावामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. या किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दोन वेळा धमकी दिली, असा नवा गंभीर आरोप करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली. सोमय्या पिता-पुत्र दोघेही लवकरच जेलमध्ये जाणार असा दावा पुन्हा राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज, शुक्रवारी पुन्हा किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. किरीट सोमय्या कोण आहे? इथे-तिथे फिरून बंगले शोधत आहेत. तुरुंगात जाण्याचा मार्ग ते शोधत आहेत, असं राऊत म्हणाले. ठाकरे कुटुंबीयांच्या १९ बंगल्याबाबत विचारलं असता, यावर वारंवार स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. अदृश्य झालेले आहेत. हा भुताटकीचा प्रकार वाटतो. भाजपच्या नेत्यांना भुताटकी झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या बेनामी मालमत्ता आहेत, म्हणून ते बोंबलत सुटले आहेत, असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here