मुंबई,दि.१७: Sanjay Raut On EC शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या बिहारमध्ये निवडणूकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. एका पत्रकाराला निवडणूक आयोगाच्या विरोधात घोटाळ्याची बातमी देणाऱ्या एका पत्रकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
”इलेक्शन कमिशन व भाजप हातात हात घेऊन काम करत आहेत. इलेक्शन कमिशन देशाचा इलेक्शन कमिशन नाही तर तो भाजपचा इलेक्शन कमिशन आहे. सर्व राज्यांमध्ये असेच आहे. निष्पत्क्ष निवडणूका होण्याची अपेक्षा आम्ही ठेवत होतो पण आता तसं होत नाही. निवडणूक आयोग हे भाजपचे एक ऑफिस आहे तिथून भाजपला जे हवे ते केले जाते. जर एखाद्या पत्रकाराने जर निवडणूक आयोगाचा घोटाळा समोर आणला आहे. तर त्याच्यावर एफआयर करायची गरज नाही. त्याउलट त्याने जे काही समोर आणले आहे ते सुधारण्याची गरज नाही. या देशात आता ना लोकशाही आहे, ना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ना फ्रिडम ऑफ स्पीच आहे. त्यामुळे हे सर्व असे वागत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच ”महाराष्ट्रा प्रमाणे बिहारची निवडणूकही हायजॅक करायचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याने क्रांती होईल. बिहार ही क्रांतीची भूमी आहे. जेव्हा जेव्हा देशात क्रांती झाली ती महाराष्ट्र व बिहारमधून झाली आहे”, असेही ते म्हणाले.