Sanjay Raut, Deepali Sayed: दीपाली सय्यद यांच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली,दि.17:Sanjay Raut, Deepali Sayed: शिवसेनेच्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मोठं विधान केलं होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार असं म्हटलं होते. 

शिवसेनेच्या पदाधिकारी दिपाली सय्यद यांच्या एका ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार असल्याचं ट्विट करुन दिपाली सय्यद यांनी नवा ट्विस्ट राज्याच्या राजकारणात आणला. दिपाली सय्यद यांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट दिपाली सय्यद यांना विचारपूर्वक ट्विट करण्याचा सल्ला दिला आहे. 

“दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. त्या पक्षाचं काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी आहेत. तसंच प्रवक्त्या देखील नाहीत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले. ते नवी दिल्लीत एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

“शिंदे गट एकत्र येईल की नाही हे येणारा काळ ठरवेल. एकत्रित यावं असं आम्हाला का वाटणार नाही. कारण ते आमचेच सहकारी आहेत. आमचेच मित्र आहेत. ते आज माझ्यावर टीका करत असले तरी ती त्यांची मजबुरी आहे. भाजपामुळे त्यांच्यावर मजुबरी ओढावली आहे. तरीसुद्धा गेली अडीच वर्ष ते आमच्यासोबत सत्तेत होते. त्यांच्या अनेक अडचणी, कामं आम्ही एकत्र केली आहेत. त्यामुळे एकत्रित यावं असं का वाटणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here