मुंबई,दि.२४: Sanjay Raut On CM Devendra Fadnavis: राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी मांसाहार आणि पांडुरंगाचा उल्लेख करत विधान केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम?’
काय म्हणाले संजय राऊत? | Sanjay Raut On CM Devendra Fadnavis
महाराष्ट्रात मटण खायला बंदी आहे का? महाराष्ट्राचा मराठा धर्म नष्ट केला आहे कुणी? फडणवीसांना सांगा ते चोरून काय खातात ते आम्हाला माहित आहे. फडणवीस काय शाकाहारी आहेत का? फडणवीस काय खातात हे आम्हाला माहित नाही का? चिकन मटण का महाग झालं? कारण न खाणाऱ्यांनी रांग लावून खायला सुरुवात केली म्हणून असेही संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे अर्धज्ञानी आहेत, मुळात संपूर्ण भाजप हा अर्धवट ज्ञानी आहेत. भाजपच्या गु़डघ्यातसु्द्धा मेंदू नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहिला पाहिजे. त्यांनी त्या काळच्या बाळासाहेबांच्या मुलाखाती वाचल्या पाहिजे. एकवचनी पुस्तक आहे, त्यात बाळासाहेबांनी आपली भुमिका स्पष्ट मांडली आहे. दिलीप वेंगसरकर हे जावेंद मियांदादला घेऊन अचानक मातोश्रीत आले. आणि मियादाद बाळासाहेबांना विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान मॅच पुन्हा सुरु करा म्हणून. बाळासाहेबांनी तोंडावर सांगितलं की दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही.
जोपर्यंत कश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात सुरू आहे, तो थांबत नाही तोपर्यंत मी पाकिस्तासोबत क्रिकेट खेळायला परवानगी देणार नाही. मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदींसारखं बाळासाहेबांनी शेपूट नाही घातलं. पाकिस्तान, चीन किंवा ट्रम्पसमोर. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मोदीजी काय म्हणाले होते? रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही. आणि आता क्रिकेट चालतंय. बाळासाहेब तोंडावर म्हणाले होते चाय पियो और निकल जाओ. घरात पाहूणा म्हणून आलास, हा चहा प्यायचा आणि निघून जायचं. हे तुम्ही दिलीप वेंगसरकरांना विचारू शकता.
देवेंद्र फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि…
देवेंद्र फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांचं कुंकू पुसलं त्या महिलांचं त्यांनी कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर तुमचा पाठिंबा आहे की नाही हे सांगा. भाजपने पैश्यांसाठी पाकड्यांसमोर शेपूट घातलं आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.