Sanjay Raut: न्यायालयाचा ED ला धक्का, संजय राऊत यांची आजच सुटका

Sanjay Raut News Today: संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली

0

मुंबई,दि.9: Sanjay Raut News Today: न्यायालयाने ED ला धक्का दिला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात आपील करायचं असल्यानं संजय राऊत यांच्या जामिनाच्या अंमलबजावणीला एका आठवड्याची स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीच्या वतीनं करण्यात आली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊता यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी अशा आशयाची ईडीची मागणी मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांची आजच सुटका होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना आज जामीन मिळाला आहे.

संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीने विरोध दर्शवत त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर दुपारी 3 वाजता यावर सुनावणी करत विशेष सत्र न्यायालयाने अशी स्थगिती द्यायला नकार दिला आणि संजय राऊतांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला.

दोेन लाखांच्या कॅश बॉंडवर संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची सुटका करण्यात येणार आहे. संजय राऊत हे मागील 100 दिवसांपासून तुरुंगात आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता ईडी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या कामकाजाची वेळ साडे चार वाजेपर्यंत आहे. पण ईडीची ही याचिका तातडीने उच्च न्यायालयात घेतली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टायगर इज बॅक, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण असून शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाला दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, शिवसैनिकांमध्ये आज हजार हत्तीचे बळ संचारले संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे. आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण आहे. आज खऱ्या अर्थाने दिवाळी असून आम्ही उत्साहाने साजरी करणार आहे. आमच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आमचा सेनापती परत आला आहे. त्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे. आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here