सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है: संजय राऊत यांचे सूचक ट्विट

0

दि.१८: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा सूचक ट्विट केले आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात दररोज आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील अनेक आमदारांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आदर व्यक्त केला आहे. मात्र काही दिवस उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना शांत राहण्यास सांगावे, त्यांच्यामुळेच शिवसेना संपत आहे, असा आरोप केला आहे.

या राजकीय घडामोडी घडत असताना बंडखोर आमदार आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. संजय राऊत अनेक बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आले आहे. दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर नरेंद्र सक्सेना यांच्या कवितेतील ओळी ट्वीट करत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा उल्लेख न करता टीका केली आहे.

राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, “सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है… वे घर नहीं लौट पाते” या ट्वीटसोबत त्यांनी आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोदेखील दिसत आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी यापूर्वी देखील अनेकदा ट्वीटर आणि कवितेच्या माध्यमांतून बंडखोर आमदार आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊत यांनी अलीकडेच भारतातून पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झालेले सुप्रसिद्ध उर्दू कवी सय्यद हुसेन उर्फ जॉन एलिया यांच्या काही ओळी ट्वीट केल्या होत्या. “अब नहीं कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा है..” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here