Sanjay Raut: ईडी कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार: संजय राऊत

0

नवी दिल्ली,दि.9: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने त्यांच्यासह कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले मुंबईमध्ये फक्त शिवसेनाच (Shiv Sena) दादा असेल. राऊत म्हणाले, ईडीच्या ऑफिसमध्ये कोण लोक बेकायदा जाऊन बसतात? मग जी दोन तीन लोकं जातात, ईडीला ब्रीफ करतात, ईडीला आदेश देतात, कोणाला टॉर्चर करायचे, हे सांगतात. मी फडणवीसांना आव्हान करतोय. आणि त्यांना कळलं असणार मला काय सांगायचंय ते.

हे सारे सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. खोटे पुरावे तयार करतात. कुणीतरी उठतो बेवड्यासारखा बडबडतो आणि कारवाई करतो. त्यामुळे आता मी पुढची पत्रकार परिषद सेना भवनात घेणार. त्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार. हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून देणार असा इशाराच राऊत यांनी दिलाय.

आणीबाणी पेक्षाही भयंकर

संजय राऊत म्हणाले की, सगळ्यात जास्त ईडीचे खटले महाराष्ट्रातच कसे काय? बिहार आणि यूपी, दिल्लीत कसे नाहीत? तर हे सारे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्राचे षडयंत्र सुरू आहे. आणीबाणीत ते तुरुगांत होते. ते जेलमध्ये गेलेत आणि कालच मोदी यांनी राज्यसभेत आणीबाणीतल्या दमनशाहीची आठवण करून दिली. कशा प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सरकार तर आणीबाणीपेक्षाही भयंकर प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

पुरावा देणार

संजय राऊत म्हणाले, त्या लेटरनंतर मला जवळपास सगळ्यांच राज्यातील विरोधी पक्षनेत्यांचे फोन आले. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून खोटेनाटे आरोप करायचे, त्यांना बदनाम करायचे. ते भ्रमात आहेत. मात्र, आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. राष्ट्रीय एजेन्सी असलेल्या ईडी आणि इतर एजेन्सी या भाजपच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सेंडिमेंटचा भाग आहेत. हा ट्रेलरही नाही. ट्रेलर अजून यायचाय. कशा प्रकारे हे क्रिमिनल सेंडिकेट चालवतात, कसं ब्लॅकमेल करतात, कसं मनी लॉड्रिंग करतात हे पुराव्यानिशी दाखवू, असा इशाराच त्यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here