दि.8: sanjay raut kirit somaiya:किरीट सोमय्यांचे (kirit somaiya) जुनं ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या हाती लागले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमवण्यात आलेल्या पैशांच्या मुद्द्यावरून संजय राऊत हे सातत्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. पैसे जमवण्याची माझी कृती निव्वळ सिम्बॉलिक होती, असा बचाव किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हाती किरीट सोमय्या यांचे एक जुने ट्विट लागले आहे. या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौकेच्या स्मारकासाठी मुंबईकर १४० कोटी रुपये द्यायला तयार असल्याचे म्हटले होते. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.
मैने तो ५८ करोड का हिसाब मांगा था…बात १४० करोड तक पहुंच गयी.. क्रोनोलिजी को समज लिजिये. प्यारे देश भक्तो… गडबड ही गडबड हैं.., असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे आता किरीट सोमय्या यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. तत्पूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतानाही किरीट सोमय्या यांच्यावर आगपाखड केली. किरीट सोमय्या विचारतात की, ५८ कोटीचा आकडा कुठून आला? मग ते पाच, दहा हजार कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करतात, ते आकडे कुठून येतात? किरीट सोमय्या यांच्यावर पुराव्यांच्या आधारेच गुन्हा दाखल झाला आहे. किरीट सोमय्या यांनी पैसे जमवले की नाही, हा खरा प्रश्न आहे. किती पैसे जमवले हे पोलीस शोधून काढतील? किरीट सोमय्या यांनी १० दिवस पैसे गोळा केले. त्यामधून सात खोकी भरली. हा पैसा व्हाईट करण्यात आला. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी नौटंकी बंद करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
किरीट सोमय्या
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठीच्या मोहीमेतंर्गत मी पैसे जमवले होते. पण ते केवळ प्रतिकात्मक होतं. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी रेल्वे स्थानकांवर जाऊन लोकांकडून फारफार तर दोन-दोन रुपये गोळा केले असतील. या पैशांनी विक्रांत युद्धनौका वाचवता येणार नव्हती. ‘सेव्ह विक्रांत’ अभियानासाठी केलेली ही एक फक्त प्रतिकात्मक कृती होती, असे स्पष्टीकरण भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिले आहे.