मुंबई,दि.१६: Sanjay Raut On Kirit Somaiya: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (दि.१५) पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आज सकाळी किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राऊतांना प्रत्युत्तर दिलं. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद संपते ना संपते लगेचच संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर वसुलीचा खळबळजनक आरोप केला आहे.
ईडीच्या नावाने धमकावून कोट्यवधी रुपये जमवले
संजय राऊत म्हणाले, मुंबईतील बिल्डर मुंबईतील व्यापारी यांच्याकडून ईडीच्या नावाने धमक्या देऊन या किरीट सोमय्याने आतापर्यंत शेकडो कोटी जमा केले आहेत. ८ jvpd स्कीम, सुजीत नवाब नावाचा एक प्लॉट आहे. तो प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई बिल्डर या दोघांनी मुळ मालकाला ईडीची धमकी देऊन १०० कोटी रुपयांचा प्लॉट त्याहूनही अधिक जास्त किमतीचा प्लॉट मातीमोल भावाने अमित देसाईंच्या नावाने करून घेतला.
१५ कोटी ईडीच्या अधिकाऱ्याला दिले
ईडीची धमकी देऊन हा प्लॉट आपल्या नावे करून घेतला आहे आणि त्यातले पंधरा कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी कोणत्या ईडी अधिकाऱ्याला नेऊन दिले हे स्पष्ट करावं ईडीने… नाहीतर मी त्या अधिकाऱ्याचं नाव घेईल असंही संजय राऊत म्हणाले.
१९ बंगले कुठे आहेत दाखवा ना?
किरीट सोमय्या हा इन्वेस्टगेटिव्ह अथॉरिटी नाही. भाजप आणि सांगावं किरीट सोमय्या हा जबाबदार माणूस आहे आणि त्याच्या आरोपाची आम्ही सहमत आहोत. मला कागद वगैरे काही सांगू नका, बंगले आहेत की नाही हे सांगा ? मी आव्हान दिले ना… १९ बंगले कुठे आहेत ते दाखवा. देवस्थानच्या जमिनी कुठे आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
अमोल काळे कुठेय?
एक दूधवाला महाराष्ट्र येतो, या ठिकाणच्या सरकारमधील काही नेत्यांचे पैसे आपले धंद्यात गुंतवतो आणि सात हजार कोटींचा मालक होतो. माझा प्रश्न आहे, अमोल काळे कुठे? नाहीतर आम्ही समोर आणू…. अमोल काळे सोबत व्यवहार काय ? सुरुवात त्यांनी केली आहे शेवट आम्ही करणार असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.