sanjay raut: सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल तर महाराष्ट्र भवनासाठी बेळगावात जागा द्या: संजय राऊत

मला कुणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो असे संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटले आहे

0

नाशिक,दि.3: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सोलापुरात (Solapur) कर्नाटक भवन (Karnataka Bhawan) बांधणार असाल, तर आम्हाला बेळगावात (Belgaon) महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhawan) बांधण्यासाठी जागा द्या असे म्हटले आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली. म्हणून तुम्ही सोलापुरात कर्नाटक भवन उभं करायचं म्हणत आहेत. मात्र सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असा उलट सवाल संजय राऊत (sanjay raut news) यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे.

मला कुणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना आई-बहिणीवरुन उत्तम शिव्या देता येत असतील, तर त्यांनी त्या महाराष्ट्र राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते आणि मंत्री यांना द्याव्यात, आम्ही शिव्या देणाऱ्यावर फुलं उधळू, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. राऊत तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला.

जाहिरात

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे प्रत्येक राज्याशी प्रेमाचे संबंध असून कर्नाटकाशी सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री काल परवा नवस फेडायला गेले होते. गुवाहाटीवरून येताना आसाममध्ये आसाम भवन उभ करण्याच ठरवलं. तर दुसरीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन उभं करणार असल्याचे सांगितले. मुंबईमध्ये सुद्धा अनेक भवन आहेत. कानडी बांधवांचे अनेक हॉल्स, भवन आहेत. पण जर तुम्ही सीमा वादाच्या लढ्यात काही गावांवरती हक्क सांगताय म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या. बेळगाव आणि बेंगलोरला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा असून या ठिकाणी दोन भवन बांधण्यात येईल, त्या संदर्भात निर्णय व्हावा, मग आम्ही तुमचा विचार करू असे संजय राऊत कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavaraj bommai) यांना सुनावले.

त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या आपणावर शिंदे गटातील आमदार मूग गिळून आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले, मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर तो माझा मी सन्मान समजतो. खर म्हणजे त्यांना जर उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्री यांना द्याव्यात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू, आम्ही त्यांना संधी देतोय, छत्रपती शिवरायांचा अपमान तुम्ही सहन करताय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सहन करताय, द्या ना त्यांना शिव्या, तुम्हाला जर इतक्या उत्तम शिव्या देता येत असतील, त्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमच्या शिव्यांच कौतुक करेल अशा भाषेत संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांना सुनावले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here