मुंबई,दि.७: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करून तसे संकेत दिले आहेत. खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या रकमेचे काय झाले? ती रक्कम कुठे गेली, असे प्रश्न शिवसेना उपस्थित केले आहेत.
किरीट सोमय्यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचेही आरटीआयमधून समोर आले आहे. याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. संजय राऊत म्हणाले की, ‘विक्रांत फाइल्स,’ ‘काश्मीर फाइल्स’पेक्षा गंभीर आहे. सध्या भाजपचे कार्यालय झालेल्या राजभवनाने किरीट सोमय्यांकडून कोणताही निधी किंवा चेक मिळाला नाही, असे सांगितले आहे. किरीट सोमय्यांनी ५८ कोटी रुपये लाटले आहेत. 
संजय राऊतांनी या संदर्भात आज पुन्हा एक ट्विट करत सोमय्यांना इशारा दिला आहे. Mark my word…INS विक्रांत चया नावे  ५६ कोटी  गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेटायाना जेलमध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण  करणाऱ्या भाजपाला जाब विचाराच लागेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
 
            
