नागपूर,दि.२४: एक पुतीन दिल्लीत बसले आहेत आणि ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) नागपुरात असून यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली. रशियाने युक्रेन (Russia Ukraine War) विरोधात युद्ध सुरू केले आहे. युद्धाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांना जबाबदार धरत अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट पुतीन यांच्याशी केली आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या कारवायांवर बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. संजय राऊत सध्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने नागपुरात असून यावेळी ते एका कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा Neeru Bajwa: ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर अभिनेत्री नीरू बाजवा केला किलर डान्स
“आपल्या देशात युद्ध नसेल पण आमच्या सारखे लोक सुद्धा रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीत बसले आहेत आणि ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून बॉम्ब, मिसाईल सोडले जात आहेत. रोज एक मिसाईल येत असून आम्ही त्यातून वाचलो आहोत,” असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रावर असे हल्ले करणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले.
“ज्या राज्यांमध्ये आपली सरकारं नाहीत त्या राज्याशी अधिक सन्मानानं वागलं पाहिजे हे आम्हाला पंडित नेहरुंकडून शिकायला मिळालं. आपल्या विरोधात बोलणारे, विरोधी सूर लावणारे जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांचा अधिक सन्मान करणं ही खरी लोकशाही,” असंही यावेळी ते म्हणाले.
संजय राऊतांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला. “पुन्हा येईन वाले संध्याकाळी इथे येणार आहेत. तेव्हीही मी येईन. बाजूला बसेन,” असं संजय राऊतांनी सांगितलं.