मुंबई,दि.5: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरचा फ्लॅटही जप्त केला आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपा व ईडीला आव्हान दिले आहे. “मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे – अपराजेय” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
ट्विट करून संजय राऊत यांनी थेट भाजपला आणि ईडीला आव्हान दिलं असल्याची चर्चा आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर संजय राऊतांनी एक ट्वीट केलंय. त्यामध्ये संजय राऊत म्हणतात की, “मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड फेंकोगे! चुन चुन कर आगे बढूंगा मै, तुम मुझको कब तर रोकोगे!!”
ईडीच्या कारवाईनंतर काय म्हणाले संजय राऊत?
ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ईडी असो वा सीबीआय माझ्या मागे लागली आहे याची कल्पना मला होती. ईडीने केलेल्या कारवाईचं मला आश्चर्य वाटत नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्यांना जर मदत केली नाही तर माझ्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील अशी माहिती होती.
आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो
खासदार संजय राऊत म्हणाले की, “या देशात खोट्या केस, खोटे पुरावे कधी निर्माण झाले नव्हते, आता होत आहेत. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन. मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो, मी शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा, मर्द मराठी माणूस आहे.. काय कराल तुम्ही. इथे बंदूक लावाल ना तुम्ही, हे ईडी सीबीआय भाडोत्री भाजपने लावलं आहे ना, या खोटेपणाला संजय राऊत घाबरत नाही.”