sanjay raut birthday: रोहित पवारांनी संजय राऊत यांना दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

sanjay raut birthday रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे असे ट्विट करत रोहित पवारांनी संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

0

मुंबई,दि.१५: sanjay raut birthday राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. सलग चारवेळा शिवसेनेकडून खासदार झालेले, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ असलेले फायरब्रँड नेते आणि फर्डे वक्ते, हाडाचे पत्रकार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा आज वाढदिवस… राऊत आज ६३ व्या वर्षात पदार्पण करतायेत.

नुकतेच जेलमधून सुटून आलेल्या राऊतांना भेटून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी गर्दी केलीये. पुष्पपुच्छ, शाल-श्रीफळ हारतुरे देऊन शिवसैनिक त्यांचं अभिष्टचिंतन करतायेत. तसेच सोशल मीडियावरुनही राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातायेत. राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनीही राऊतांचं अभिष्टचिंतन केलं ते ही आपल्या खास स्टाईलने…. राऊतांना शुभेच्छा देणारं रोहित पवार यांचं ट्विट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतंय.

रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे आणि ‘मोडेल पण वाकणार नाही, कुणापुढं झुकणार नाही’, हा मराठी बाणा जगणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊतसाहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात रोहित पवार यांनी राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चुकीच्या गोष्टींविरोधात लढण्यासाठी आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

शिवसेनेचा प्रमुख चेहरा आणि राजधानी दिल्लीदरबारी शिवसेनेचा आवाज म्हणून राऊतांची ओळख आहे. शिवसेनेच्या प्रमुख १७ नेत्यांच्या यादीत संजय राऊत यांच्या नावाचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंना कुठलीही रणनीती आखायची असो वा शिवसेना पक्ष म्हणून कोणता मोठा निर्णय असो, राऊतांचा सहभाग असल्याशिवाय ती चर्चा पुढेच जात नाही, असा गेल्या काही वर्षांचा इतिहास आहे. महाविकास आघाडीच्या निर्मितीत ही गोष्ट अधोरेखित झाली. उद्धव ठाकरेंचा शब्द झेलून धरणारे म्हणून राऊतांची ओळख आहे. जे उद्धव ठाकरेंना बोलायचं असतं, तीच भूमिका राऊत मांडतात, असं शिवसेनेच्या अनेक नेतेमंडळींना वाटतं. आधी बाळासाहेबांची भूमिका अग्रलेखातून मांडणारे राऊत आताही त्याच शैलीतून उद्धव ठाकरेंचीही भूमिका मांडतात. सध्या लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून विरोधकांना घायाळ करणाऱ्या राऊतांची राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठी क्रेझ आहे.

सुरुवातीला लोकप्रभा, नंतर इंडियन एक्सप्रेस आणि गेल्या २ तपाहून अधिक काळ सामनासारख्या वृत्तपत्राचं कार्यकारी संपादकपद राऊतांनी सांभाळलं. राऊतांचं करिअर पत्रकार म्हणून सुरु झालं. बातमीची जाण, बातमीवरील पकड, बातमीचा मागोवा घेण्याची पद्धत आणि बातमीचा इम्पॅक्ट यामुळे अल्पावधीत राऊत लोकप्रिय झाले. त्यांच्या क्राईम रिपोर्टिंगने अंडरवर्ल्डचे अनेक भयानक किस्से लोकांसमोर आले. नंतर त्यांच्या लिहिण्याच्या स्टाईलमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या राऊत संपर्कात आले. पुढे राऊतांनी मागे वळून पाहिलं नाही. बाळासाहेब गेल्यानंतर राऊत उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या साथीला खंबीरपणे उभे आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर बंडखोर नेते ठाकरेंवर वैयक्तिक टीका करत असताना राऊत ठाकरे कुटुंबाची ढाल झाले अन् बंडखोर नेत्यांवर पलटवार करताना शाब्दिक आसूड ओढत राहिले. प्रसंगी त्यांना एका केसमध्ये जेलमध्ये जावं लागलं. पण मेलो तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here