Sanjay Raut Arrested: शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून अटक

0

मुंबई,दि.1: Sanjay Raut Arrested: शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने मध्यरात्री अटक केली आहे. सायंकाळी 5.30 पासून त्यांची ईडी कार्यलयात चौकशी सुरू होती. यानंतर आता त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना 11 वाजून 38 मिनिटाला अटक करण्यात आल्याचं ईडी सूत्रांनी सांगितलं आहे. ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत उपस्थित आहे. काही वेळापूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना बोलून घेतलं होतं. ईडी कार्यालयातून बाहेर येताना ते काही कागदपत्रे आपल्यासोबत बाहेर घेऊन आले. जे राऊत यांना अटक करण्यात आल्याचं मेमो असल्याचं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबई ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यांचे हस्ताक्षर झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी रविवारी सकाळी सात वाजताच दाखल झाले होते. त्यांनी सोबत पोलिसांचा आणलेला फौजफाटा पाहता राऊत यांना ताब्यात घेणार असल्याचे संकेत मिळत होते. मैत्री बंगल्यावर सकाळी सात ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली. यानंतर राऊत यांना ईडीने बलार्ड एस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात नेले. तिथेही रात्री उशिरा पर्यंत चौकशी करण्यात आली. या चौकशीत राऊत सहकार्य करत नसल्याने त्यांना पीएमएलए कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

याबाबत माहिती देताना सुनील राऊत म्हणाले आहेत की, ”संजय राऊत यांना खोट्या प्रकरणात अडकवलं जात असून त्यांना अटक करण्यात आली आहे. उद्या सकाळी साडे नऊ वाजता त्यांना जे जे रुग्णालयार मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. आज जी केस करण्यात आली आहे, यामधे पत्रा चाळीचा उल्लेख नाही. त्यामध्ये मागच्या ज्या काही 50 लाख रुपयांच्या ट्रांजेक्शन झाले होते, त्याचा उल्लेख आहे.” ते म्हणाले, ”संजय राऊत यांची तब्येत व्यवस्थित आहे. आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत. सत्याचा विजय होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here