मुंबई,दि.22: संगीता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी गंभीर आरोप केले होते. मराठा समाज विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच मराठा आंदोलनात उभी फुट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले होते.
अजय बारसकर यांच्यानंतर आता आणखी एका सहकाऱ्याने मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंनी जरांगेंवर गंभीर आरोप केलेत. मनोज जरांगेंनी महाराष्ट्राला वेडं बनवलं, आरक्षण मिळालं मग आंदोलनाची गरज काय? असे सवाल वानखेडेंनी जरांगेना विचारलेत. सुरुवातीला मनोज जरांगे यांच्यावर विश्वास ठेवला, कारण त्यांच्या भोळा भाबडा माणूस असल्याचं वाटलं होतं, मनोज जरांगेंची बाजू घेऊन अनेकवेळा छगन भुजबळ यांनाही ट्रोल केलं.
पण आता आता कळलं मनोज जरांगे काय आहेत. मनोज जरांगे हे शरद पवार यांचा माणूस आहे. शरद पवार जसं सांगतात तसं जरांगे करतात, शरद पवारांचे त्यांना फोनही येतात, असा गंभीर आरोप वानखेडेंनी केलाय. पुण्यात मनोज जरांगेंचे ज्यांना बॅनर लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते असं खुलासाही वानखेडे यांनी केलाय.