योगायोग: संदीप ओंबासे कॉन्स्टेबल ते वरिष्ठ अधिकारी

0

सोलापूर,दि.25: योगायोग: सोलापूरच्या रेल्वे मैदानावर मध्य रेल्वे सोलापूर मंडल विशेष गुप्तचर विभाग कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या कार्यक्रमाचा योगायोग असा की सोलापूर येथील संदीप यशवंतराव ओंबासे हे 1987 साली याच रेल्वे मैदानावर आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करताना रेल्वे सुरक्षा बलामध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले.
पुढे आपल्या कामाचा धडाका आणि प्रामाणिकपणा या बळावर त्यांना विविध प्रमोशनस् (बढती) मिळत गेली.

रेल्वे क्राईम ब्रांच अधिकारी म्हणून माटुंगा, दादर, पनवेल, कल्याण, तुर्भे आणि आता सोलापूर झोन. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. योगायोग असा की विशेष गुप्तचर शाखा सोलापूर प्रमुख कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते पार पडले. याच रेल्वे मैदानावर 1987 साली कॉन्स्टेबल मधून भरती झाले आणि याच मैदानावर वरिष्ठ अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत.

हा खरचं योगायोगच म्हणावा लागेल. काही अपवाद वगळता खूप कमी लोकांच्या आयुष्यामध्ये हा योगायोग येतो. या कार्यक्रमासाठी रेल्वेचे डी. आर. एम नीरजकुमार दोहरे, सोलापूरचे ए. डी. आर. एम, विभागीय सुरक्षा आयुक्त आदित्य व उच्च अधिकारी व मान्यवर तसेच रेल्वे स्टाफ उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here