Samruddhi Mahamarg Bus Accident: समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग, ३२ प्रवाशी बचावले

0
धावत्या बसला आग

अमरावती,दि.१: Samruddhi Mahamarg Bus Accident: समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग लागल्याची घटना घडली. बसमधून ३२ प्रवाशी सुखरूप आहेत. अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या खासगी बसला एसीची वायर शॅार्ट झाल्याने आग लागली. ही घटना समृद्धी महामार्गावर चॅनल २८० जवळ ३० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता घडली. सुदैवाने यातील दोन चालकांसह ३२ प्रवाशी सुखरुप आहेत.

Samruddhi Mahamarg Bus Accident | खासगी बसला आग

अमरावती येथुन खासगी बस क्रमांक एमएच ३७ टी ५४५४ ही पुणे येथे जाण्यासाठी शनिवारी रात्री निघाली होती. समृद्धी महामार्गावर चॅनल नं. २८० जवळ ही बस पोहचल्यानंतर बसने पेट घेतली. ही बाब चालकाच्या निदर्शनास येताच त्याने बस रस्त्याच्या बाजुला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. या घटनेची माहिती मिळताच फर्दापूर चौकीचे पीएसआय उज्जैनकर, हेकॅा. कोळी, पोकॅा. नाझीर यांनी घटनास्थळावर धाव घेतली.तसेच क्यूआरव्ही पथकाच्या मदतीने आग विझवण्यात आली.

या बसचे चालक शेख रज्जाक शेख आयुब रा. दारव्हा आणि प्रविण मुंडे रा. मंगरुळपीर यांच्यासह ३२ प्रवाशी सुखरुप आहेत. पोलिसांनी या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून रवाना केले. खासगी बसमधील एसीचा केबल शॅार्ट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here