Samruddhi Mahamarg Accident: खासगी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 1 ठार, 20 जखमी

0

बुलडाणा,दि.20: Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. यात एक ठार तर 20 जखमी झाले आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या समृद्धी महामार्गावर सुरु होताच अपघातांची मालिकादेखील सुरु झाली आहे. वन्यप्राणी रस्त्यावर आल्यानेही अनेक अपघात होत आहेत. टायर फुटण्याच्या घटनाही घडत आहेत. अशातच आज पहाटे समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. 

खाजगी प्रवासी बसला अपघात | Samruddhi Mahamarg Accident

बुलढाण्यातील देऊळगाव राजा जवळ जाणाऱ्या समृद्धी मार्गावर खाजगी प्रवासी बसला अपघात झाला. यामध्ये एक ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालन्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

नागपूरहून औरंगाबादला जात असताना अपघात | Accident News

राही ट्रॅव्हल्सची खाजगी लक्झरी बस नागपूरहून औरंगाबादला जात असताना देऊळगावजवळ बसला अपघात झाला. बस समृद्धी महामार्गावर मध्यभागी उलटली. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात होते.

प्रवासी रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here