Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, हज यात्रेसाठी निघाले होते कुटुंब

0

छत्रपती संभाजीनगर,दि.11: Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) होणाऱ्या अपघाताची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान शनिवारी (10 जून) पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हज यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात | Samruddhi Mahamarg Accident

या घटनेत एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या दुभाजकामध्ये उलटली. कारचं टायर फुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई येथून बिहारमधील छाप्राकडे निघालेल्या कारला समृद्धी महामार्गावर वैजापुरजवळ जांबरगाव ते लासुरगावदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी येवला येथे हलवण्यात आले आहे. अख्तर रझा (वय 1 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. विशेष म्हणजे हज यात्रेला जायचे असल्याने हे कुटुंब गावाकडे जात होते. अपघातग्रस्त खान कुटुंब हे मुळ बिहार राज्यातील छप्रा येथील रहिवासी असून, ते सध्या वाशी, मुंबई येथे स्थायिक झाले आहे.

गया येथून 17 जून रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते. त्यासाठी ते आपल्या गावी छप्रा येथे जात होते. समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना जांबरगाव, लासुरगाव दरम्यान चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या दुभाजकामध्ये उलटली. गाडीचे टायर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून, चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here