समीर वानखेडेंची चौकशी होणार, दिल्लीतील अधिकारी येणार

0

नवी दिल्ली,दि.२५: आर्यन खान ड्रग प्रकरणात अनेकवेळा राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक यांनी आरोप केले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबईतील विभागीय संचालक समीर वानखेडेंची ( ncb zonal director sameer wankhede ) आता विभागाअंतर्गत चौकशी होणार आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. अंमली पदार्थांसंबंधी क्रूझ पार्टीवरील छाप्या प्रकरणी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. आता या आरोपांप्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

मुंबईच्या क्रूझवर अंमली पदार्थ प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह उद्योगपतींचीही मुलं या प्रकरणात अडकली आहेत. या प्रकरणी किरण गोसावी याच्या मार्फत २५ कोटींची डील झाल्याचा आरोप या प्रकरणातील पंच आणि साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा आरोप साईल यांनी केला आहे. यामुळे हे प्रकरण हायप्रोफाइल साक्षीदार प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता या प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी खात्यांतर्गत चौकशी होणार आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी समीर वानखेडे यांच्यी खात्यांतर्गत चौकशी होणार असून दिल्लीतील तीन सदस्यांच्या टीमकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. दिल्लीतील तीन सदस्यांचे हे पथक उद्या मुंबईत दाखल होणार आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह आणि २ निरीक्षक स्तरावरील अधिकारी यांचा या पथकात समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं एएनआयने म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here