समीर वानखेडे मुस्लिमच नोकरीसाठी त्यांनी धर्म बदलला : नबाब मलिक

0

मुंबई,दि.२५: NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक यांनी केला आहे. त्यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक कथित जन्मदाखल्याचा फोटो ट्विट केला आहे. त्या कथित जन्मदाखल्यामध्ये १४ डिसेंबर १९७९ अशी तारीख दिसत असून समीर आणि मुस्लिम असं इंग्रजीत लिहिलेलं दिसतं आहे. 

वानखेडे यांचा तरुण असतानाचा मुस्लिम पद्धतीने केलेल्या विवाहाचा फोटो ट्विट करत त्यावर पैचान कौन? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये एक कागदही नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. ट्विट करून ”यहाँ से शुरू होता है फर्जीवाडा” असं नवाब मलिकांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचदरम्यान समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही फोटो व्हायरल झाला आहे. 

समीर वानखेडेंचा लग्नातला फोटो व्हायरल झाला. हा फोटो वानखेडेंच्या पहिल्या लग्नातला असल्याचं सांगितल जातं आहे. या फोटोत एकूण पाचजण दिसत आहेत. त्यात वानखेडेही आहेत. सोबत डॉ. शबाना कुरेशीही आहेत. त्या त्यांची पहिली पत्नी असल्याचं सांगितलं जातं. सोबत समीर वानखेडेंचे आई-वडील आणि आणखी एक व्यक्ती दिसत आहे. मुस्लिम पद्धतीनं हा विवाह झाला असावा असं त्यांनी केलेल्या पेहरावाद्वारे दिसून येतं. मात्र, या फोटोच्या सत्यतेबाबत समीर वानखेडे यांनी २००६ साली माझं पहिलं लग्न झालं होतं आणि त्यानंतर घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली.

वानखेडे यांचा फोटो झूम करत नवाब मलिकांनी ट्वीट केला आहे. या फोटोवर पैचान कोन असं नवाब मलिक विचारत आहेत. त्याआधीही नवाब मलिकांनी एक फोटो ट्विट केला. हा समीर वानखेडेंच्या जन्माचा दाखला असल्याचं समजतंय. फोटो अस्पष्ट असल्यामुळे काही गोष्टी समजू शकल्या नाही. पण या कागदावर आईचं नाव झेहदा वानखेडे आणि वडलांचं नाव दाऊद वानखेडे असं लिहिलेलं आहे. १९७९ सालचा हा दाखला आहे, १४-१२-१९७९ अशी या दाखल्यावर तारीख दिसतेय. या दाखल्याचा फोटोही नवाब मलिकांनी शेअर केलाय. समीर वानखेडे जन्मानं मुस्लिम आहेत, असं हा दाखला सांगतो. हाच दाखला नवाब मलिकांनी ट्विट केलाय आणि यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा असं म्हटलं आहे.

दरम्यान समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळले असून आपण न्यायालयात उत्तर देऊन असं म्हटलं आहे. मात्र असं असतानाच आता या प्रकरणावरुन आमने-सामने आलेले वानखेडे आणि नवाब मलिक हे दूरचे नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. खुद्द नवाब मलिक यांनीच यासंदर्भातील माहिती दिलीय.

समीर वानखेडे आणि नबाब मलिक नातेवाईक

समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीसंदर्भात एबीपी माझाशी बोलताना नवाब मलिक यांनी या अधिकाऱ्याने अनेकदा खोटारडेपणा केल्याचा आरोप केलाय. यावेळी मलिक यांना तुमचं वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीशी काही बोलणं झालं का असं विचारण्यात आलं असता त्यांनी वानखेडे आणि ते दूरचे नातेवाईक असल्याचं काही लोकांकडून कळल्याचं सांगितलं. “काही लोकांनी माहिती दिली लांबून काहीतरी नात्यातील आमची एक बहीण आहे. त्यांची मुलगी ज्या घरात आहे. त्यांचं (वानखेडे कुटुंबाचं) त्या मुलीशी काहीतरी नातं आहे,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here