मुंबई,दि.22: Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case: NCBचे Sameer Wankhede यांच्या बद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी क्रुझ ड्रग पार्टीवर कारवाई करत अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केली होती. यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. क्रुझ ड्रग पार्टीवर करण्यात आलेली कारवाईच बोगस असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. (Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case)
क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईलने आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचा दावा केला होता, तसेच 18 कोटी रुपयांवर डील झाली होती असा दावा केला होता. यानंतर राज्य सरकारने याप्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.
प्रभाकर साईलने केलेल्या दाव्याबाबत समीर वानखेडे यांच्या विरोधात कथित खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांना पुरावेच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे 31 डिसेंबरला एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक म्हणून समीर वानखेडेंचा कार्यकाळ सुखासुखी संपणार असल्याची चिन्हे आहेत.
कथित खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी चौकशी समिती स्थापन केली होती. एएनआय वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान वसुली प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत कथित वसुलीच्या आरोपांची चौकशी थांबविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 20 जणांची चौकशी केली आहे, मात्र काही पुरावा सापडलेला नाही. यामुळे गुन्हादेखील दाखल करत आलेला नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.