दि.25: NCB मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या ड्रग्ज कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. नबाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB official Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी समीर दाऊद वानखेडे (Sameer Dawood Wankhede) यांच्या लग्नातला फोटो ट्विटरवर (Twitter) शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. या फोटोच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसंच एनसीबीनं देखील यावर काही अधिकृत भाष्य केलेलं नाही.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ‘पहचान कौन’ असं मलिक यांनी वानखेडे यांचे फोटो शेअर करताना म्हटलं आहे. त्या पाठोपाठ मलिक यांनी समीर वानखेडे यांचं जातप्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ‘इथूनच सुरू झाली सगळी घोटाळेबाजी’ असं मलिक यांनी वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राचा संदर्भ देत म्हटलं आहे. मलिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रथमच वानखेडे यांचा ‘समीर दाऊद वानखेडे’ असा पूर्ण उल्लेख केला आहे. वानखेडे यांनी गैरप्रकार करून नोकरी मिळवली आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा WhatsApp चॅट लिकमुळे हैराण झालेले बॉलिवूड स्टार्स फोनचा डेटा करत आहेत डिलीट
नवाब मलिक यांनी आज दोन ट्विट केलेत. आज दुपारी ते पत्रकार परिषद घेऊन या ट्विटबद्दल अधिक खुलासा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एनसीबी किंवा समीर वानखेडे यांची यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.