Sambhajiraje Chhatrapati On Jitendra Awhad: संभाजीराजे छत्रपती यांनी दिला जितेंद्र आव्हाड यांना इशारा

Sambhajiraje Chhatrapati: जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं होतं

0

मुंबई,दि.7: Sambhajiraje Chhatrapati On Jitendra Awhad: संभाजीराजे छत्रपती यांनी जितेंद्र आव्हाड यांना इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज तसेच अफजल खान आणि शाहिस्तेखानाविषयी वक्तव्य केलं होतं. आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आव्हाडांवर वादग्रस्त टीका केली. तर यानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनीही जितेंद्र आव्हाड यांना थेट इशारा दिला आहे.

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले ? | Sambhajiraje Chhatrapati On Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन संभाजीराजे छत्रपती यांनीही आता आव्हाड यांना थेट इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असे ट्विट करत छत्रपती संभाजीराजे यांनीही आता आव्हाड यांना थेट इशारा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

‘मोघलांचा इतिहास पुस्तकातून काढणार असं तावडेंनी विधानसभेत जाहीर केलं. पण समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. त्याच्यातून ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना,’ असं आव्हाड म्हणाले होते.

भाजपाकडून आव्हाडांवर आक्रमकपणे टीका केली जात आहे. यावरच आता आव्हाडदेखील आक्रमक झाले आहेत. मी केलेल्या विधानानंवर सारवासारव करत नाही. मी याआधीही कधी तसे केलेले नाही. मी फार विचार करूनच बोलतो. अंदमान, निकोबर तसेच तुरुंग काढून टाका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास समजावून सांगा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

संभाजी महाराज, सुलतान अकबर मित्र होते… | Maharashtra News

“शिवाजी महाराजांनी लाखाचे सैन्य घेऊन आलेल्या अफजलखानाला पाच जणांना सोबत घेऊन मारून टाकले. म्हणूनच त्याला अर्थ आहे. त्यांना शिवाजी महाराजांची महानता लोकांना समजू द्यायची नाही. त्यांना संभाजी महाराज एका धर्मात बंद करून ठेवायचे होते. औरंगजेबाचा बंडखोर पुत्र औरंगजेबाशी भांडला होता. तसेच दिल्लीची सल्तनत संभाजी महाराजांना आपण दोघे ताब्यात घेऊया असे सांगतो. मात्र काही गद्दार सुलतान अकबराचे डोके फिरवू पाहतात. आपण संभाजी महाराजांना ठार करू आणि राज्यकारभार ताब्यात घेऊ असे अकबराला सांगतात. हीच बाब सुलतान अकबर संभाजी महाराजांना सागतो. त्यानंतर संभाजी महाराज त्या पाच जणांना हत्तीच्या पायाशी देतात. हा इतिहास त्यांना सांगू द्यायचा नाही. संभाजी महाराज, सुलतान अकबर मित्र होते. दोघांचेही वेगवेगळे धर्म होते. पण दिल्लीची सल्तनत ताब्यात घेण्याचा त्यांचा उद्देश एकच होता. हे संदर्भ द्यावे लागतात. त्याशिवाय इतिहास सांगता येत नाही,” असेही आव्हाड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here