Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संतप्त प्रतिक्रिया

Sambhajiraje Chhatrapati: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं

0

मुंबई,दि.19: Sambhajiraje Chhatrapati on Bhagat Singh Koshyari: संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. ‘आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं विधान राज्यपालांनी केलं आहे.

औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थितीत होते. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून संभाजीराजे छत्रपती यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं.

काय म्हणाले होते राज्यपाल?

‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.

‘तुम्ही नवे विद्यार्थी आहात. लवकरच नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहात. नवीन काही लक्ष्य समोर ठेवणार असाल तर पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी आहे. दोन्ही नेते संकल्प शक्ती आहे, व्हिजनरी आहे, सोबत गडकरी हे तर मिशनरी आहे, ते एकदा मागे लागेल तर काम केल्याशिवाय मागे हटत नाही’ असंही राज्यपाल म्हणाले.

‘आम्ही जेव्हा विश्वगुरू बनू सांगत होतो तर वेड्यात काढत होते मात्र आता प्रगतीपाहुन धक्क झाले. घरा घरात शौचालय बनवणे मोठे अवघड होते पण मोदींनी ते करून दाखवले. पहिले बँकेत खाते उघडत नव्हते मात्र आता प्रत्येक्कांचे बँक खाते आहे. आपला पंतप्रधान महत्वकांक्षी आहे’, असं म्हणत राज्यपालांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here