sambhaji bhide: पुन्हा एकदा संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

0

पुणे,दि.18: sambhaji bhide: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यापूर्वीही अनेकदा संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. लिव्ह इन रिलेशनशिप अयोग्य नाही असे म्हणणारे न्यायालय ही योग्य नाही असे वक्तव्य यापूर्वी केले होते. डॉक्टर लुटारू आहेत असेही वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदू समाजाने इस्लामला तितक्यात पोटतिडकीने प्रत्यु्त्तर दिले पाहिजे, असे आवाहनही संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले. संभाजी भिडे सध्या पुण्यातील शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन केले. याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माला लक्ष्य केले.

संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे हिंदुस्थानच्या अस्तित्त्वाला असलेले आव्हान आहे. केवळ संभाजी महाराजांशी शत्रुत्त्व होतं म्हणून औरंगजेबाने त्यांना तुकडे-तुकडे करून मारले नाही. तर यामागे इस्लाम धर्माविषयी औरंगजेबाच्या मनात असलेली पोटतिडीक कारणीभूत होती. औरंगजेबाच्या मनातील इच्छा वेगळीच होती. त्याला संपूर्ण भारताचे तुकडे-तुकडे करायचे होते. त्याला हा देश संपवून टाकायचा होता. याच रागातून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारले. मात्र, आज अनेकजण संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा काळ मागे सरला, असे म्हणतात. आता आपण नव्या युगासोबत चालुया, अशा गप्पा मारतात. मेलेली मढी कशाला उकरून काढायची, असेही म्हणतात. देशात अशा नादान, नालायक आणि देशघातकी सुशिक्षित लोकांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली.

आज संभाजी महाराज किंवा औरंगजेब अस्तित्त्वात नाहीत. पण पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या रुपाने औरंगजेब अजूनही अस्तित्त्वात आहे. देशातील गावागावांमध्ये इस्लाम धर्म आहे. हाच आपला खरा शत्रू आहे. संभाजी महाराजांनी मरेपर्यंत इस्लाम धर्म पत्कारला नाही. त्यांच्यात ती आग आणि धमक होती. त्यामुळे आता हिंदू समाजानेही तितक्याच पोटतिडकीने इस्लामला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here