Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

0

अमरावती,दि.1: Sambhaji Bhide: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यापूर्वीही अनेकदा संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. संभाजी भिडे यांनी आता डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. डॉक्टर हे लुटारु आहेत, ते मारायच्या लायकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

संभाजी भिडे हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कोरोनात १०५ टक्के लोकांचा भीतीनंच मृत्यू झाल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहे, डॉक्टर मारायच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी डॉक्टरांबाबत अपशब्द वापरले.

संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी या आधीदेखील कोरोनाबाधितांबाबत वक्तव्य केले होते. ज्यांना कोरोना होतोय, ते जगायच्या लायकीचे नसल्याचे भिडे यांनी म्हटले.

न्यायाधीशांविरोधात वक्तव्य

संभाजी भिडे यांनी या आधीदेखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जवळपास एक महिनाभरापासून त्यांनी न्यायाधीशांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले होते. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग नाही, असं म्हणणाऱ्या न्यायालये देखील वैध नाहीत, अशा न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असे भिडे यांनी म्हटलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here