Salman Khan: अभिनेता सलमान खानला चावला साप, तीनवेळा चावला

0

दि.२७: अभिनेता सलमान खानला (Actor Salman Khan) साप चावला आहे. शनिवारी रात्री पनवेलच्या फार्महाऊसमध्ये (Panvel farmhouse) सलमानला (Salman Khan) साप चावला (Snake Bit). त्यानंतर त्याला तात्काळ रात्री 3 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. काही तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली सलमानला ठेवल्यानंतर त्याला सकाळी 9 वाजता सोडलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पनवेल येथील फार्महाऊसवर रात्री सलमानला साप चावला. विषारी साप असूनही त्याच्या जीवावर बेतले नाही. उपचार घेवून सकाळी 9 वाजता सलमान खान परत आपल्या फार्महाऊस वर रवाना झाला. सध्या त्याची प्रकृती ठिक आहे. (Salman Khan says snake bit him thrice)

असा चावला साप

सलमान आता बरा आहे. पण सापाने त्याला कसे चावले आणि नक्की काय झालं याबद्दल खुद्द अभिनेत्याने सांगितलं आहे. एनआयशी संवाद साधताना सलमान म्हणाला, ‘जेव्हा माझ्या फार्महाऊसमध्ये साप आला तेव्हा मी काठीच्या मदतीने त्याला बाहेर काढत होतो, पण तोवर साप माझ्या हातापर्यंत आलेला. मग मी त्याला पकडले आणि त्या दरम्यान त्याने मला तीनवेळा चावले. हा एक प्रकारचा बिनविषारी साप होता. मी सहा तास इस्पितळात होतो आणि आता बरा आहे. मी अँडी-वेमनचा (विष विरोधी) शॉट घेतला आहे.’

सलमानने सापासोबत सेल्फीही काढला

एवढंच नाही तर नंतर सलमानने सापासोबत सेल्फीही काढल्याचं सांगितलं. या संपूर्ण घटनेनंतर त्याचे आई-वडील आणि बहिणी घाबरल्या होत्या. सलमानच्या म्हणण्यानुसार, लोकांच्या आवाजाने साप घाबरला असावा आणि त्यामुळेच त्याने चावा घेतला असावा. इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, सलमान त्याच्या फार्महाऊसवर परतला, जिथे त्याचा ५६ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी विशेष तयारी करण्यात आली होती. आज २७ डिसेंबरला सलमानचा ५६ वा वाढदिवस असून त्याला हजेरी लावण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पनवेलच्या फार्महाऊसवर पोहोचले आहेत. काल रात्री बॉबी देओल, वत्सल सेठ आणि रजत शर्मा यांच्यासह सलमानचे संपूर्ण कुटुंब फार्महाऊसवर पोहोचले होते.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here