सदाशिव बेडगे यांच्या पुढाकाराने भाजपा आणि काँग्रेस आमदाराच्या नेतृत्वात विधानभवर मोर्चा 

0
आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार अभिजित वंजारी

सोलापूर,दि.९: महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे (Sadashiv Bedge) यांच्या पुढाकाराने भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि काँग्रेस नेते आमदार अभिजित वंजारी (Abhijit Wanjarri) यांच्या नेतृत्वात विधानभवर मोर्चा काढण्यात येणार आहे. सदाशिव बेडगे यांच्यामुळे भाजपाचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेस नेते आमदार अभिजित वंजारी एकत्र येऊन ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चात सहभागी होणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने गुरुवार ११  डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम ते विधानभवनवर माजी सांस्कृतिक व वने मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात ग्रंथालय कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सदाशिव बेडगे यांनी सांगितले.

सदाशिव बेडगे

या आहेत मागण्या

१) ग्रंथालय अधिनियम १९६७ मध्ये काल सुसंगत सुधारणा करण्यात यावी. ग्रंथालय कर्मचारी यांचे काम सहा तास ऐवजी आठ तास करण्यात यावे. 

२) ग्रंथालय अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून ग्रथांलय कर्मचारी यांना  किमान वेतन दरमाह त्यांच्या खात्यावर जमा करावे .

३) ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी १० टक्के वाढ करावी

४) केंद्राचे ४७० कोटी निधी ग्रंथालय खात्यात जमा करणेसाठी शासन निर्णय काढून समान वाटप करण्यात यावा 

५) विमा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रंथालय कर्मचारी यांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा

६) ४०% अनुदान वाढीचा शासन निर्णय लवकरात लवकर निघावा

७) ग्रंथालयाचे दर्जा/ वर्ग बदलसाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा

या मागण्यासाठी मोर्चात ग्रंथालय संबंधित साहित्यिक, लेखक, प्रकाशक, विविध संघटना, ग्रंथालय कर्मचारी बंधू व भगिनी यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सदाशिव बेडगे यांनी केले आहे.

अमृत भवन विद्यापीठ लायब्ररी जवळ अंबाझरी रोड नागपूर, येथे पार्किंगसह सर्व व्यवस्था केली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here