मुंबई,दि.3: मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात वाझे हे आरोपी आहेत. अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे. सचिन वाझेंने अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले आहेत.
अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिले आहेत. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असे आरोप वाझेने केले आहेत. सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना सचिन वाझेने अडचणीत आणलं आहे.
जे काही घडले, त्याचे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत गेले. याचे सीबीआयकडे पुरावे आहेत आणि मी एक लेखी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले आहेत.सचिन वाझे हे 2021 च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही आरोपी आहेत.