सोलापूर,दि.१: Sachin Ombase Solapur: सोलापूर शहर परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे (Sachin Ombase) यांनी जुळे सोलापूर भागातील अनेक नगरांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. (Sachin Ombase Jule Solapur Visit)
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांना घरामध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा अडथळा निर्माण होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शिवगंगा नगर, शिवरत्न नगर, श्रीकांत नगर, विशाल नगर, जय जलाराम नगर, द्वारकाधीश मंदिर, द्वारकाधीश सिटी व विजापूर रोड परिसरातील नाले व सखल भागला भेट देऊन पाहणी केली.या सर्व भागांतील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. नागरिकांच्या घरात पाणी साचू नये याकरिता नाल्यांचा प्रवाह मोकळा करण्यासोबतच ज्या नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे त्या ठिकाणी तत्काळ नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता जलनिस्सारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागीय अधिकारी, अभियंते यांच्याशी चर्चा करून समस्येचे मूळ कारण शोधून काढण्यास सांगितले. अतिक्रमणामुळे नाल्यांची क्षमता कमी होऊन परिसरात पाणी साचते, त्यामुळे अतिक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी विभागीय अधिकारी किशोर तळीकेडे, माजी नगरसेवक नरेंद्र काळे, कनिष्ठ अभियंता परशुराम बुमकंडी, प्रशिक बडोले, सलीम केरबू, इमरान बागवान, चंद्रकांत गुंडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थिती होते.








