दि.1: Russia Ukraine War News: रशिया (Russia) युक्रेनवर (Ukraine) आक्रमकपणे हल्ला करत आहे. युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही युक्रेन माघारी हटण्यास तयार नाही. आता रशिया युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध लवकरच संपवण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. लढाईच्या सहाव्या दिवशी रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले. रशियाने युक्रेनची राजधानी कीव येथे 64 किलोमीटर लांबीचा आपला सर्वात लांब लष्करी ताफा पाठवला आहे, ज्यामध्ये तोफखाना, रणगाडे इत्यादींचा समावेश आहे या माहितीने दिवसाची सुरुवात झाली.
मंगळवारी रशियन सैन्य कीव-खार्किव तसेच काही महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करत आहे. यामध्ये Volyn (व्होलिन), Ternopil (टेर्नोपिल) आणि Rivne Oblast (रिव्हने ओब्लास्ट) यांचा समावेश होता. विनितसिया शहराबरोबरच या भागातही अलार्म सायरन वाजत होते. रशियाच्या विरोधात उभं असलेल्या ब्रिटनचे वक्तव्यही यावर आलं आहे. ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा आहे की रशियन सैन्याने कीव, खार्किव आणि चेर्निहाइव्हमध्ये तोफखान्याने (तोफांच्या) हल्ले तीव्र केले आहेत आणि निवासी भागांना लक्ष्य केले आहे.
सरकारी मुख्यालय केले नेस्तनाबूत
रशियन हवाई हल्ल्याने खार्किवमधील सरकारी मुख्यालय उद्ध्वस्त केले. बघता बघता इमारत व परीसरात धुरच धूर झाला. कीव जवळील एक प्रसूती रुग्णालय देखील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचे लक्ष्य बनले आहे. त्यात किती नुकसान झाले, हे सध्या कळू शकलेले नाही.
Okhtyrka येथे क्षेपणास्त्र हल्ला, 70 युक्रेनियन सैनिक ठार
रशियाने आज रिव्हने ओब्लास्टमधील (Rivne Oblast) Okhtyrka या छोट्या शहरातील लष्करी तळाला क्षेपणास्त्राने लक्ष्य केले. हे शहर खार्किव आणि कीव (राजधानीपासून 345 किमी दूर) दरम्यान आहे. या हल्ल्यात युक्रेनचे 70 सैनिक मारले गेले. हल्ल्यानंतर आलेली छायाचित्रे भयानक होती.
रशियन सैन्याने शहराला वेढा घातला
नुकसान करण्याबरोबरच रशियन सैन्याने काही शहरांना वेढा घातला आहे. त्यात खेरसन Kherson शहराचाही समावेश आहे. शहराचे महापौर इगोर कोलीखायेव यांनी दावा केला आहे की रशियन सैन्याने शहराची नाकेबंदी केली आहे. म्हणजे आता कोणालाही शहरात किंवा बाहेर जाता येणार नाही.