RRR Movie Craze In Pakistan: पाकिस्तानात ‘आरआरआर’ची क्रेझ ‘नाटू-नाटू’ वर अभिनेत्रीचा डान्स

0

मुंबई,दि.24: RRR Movie Craze In Pakistan: पाकिस्तानात ‘आरआरआर’ चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे. ‘नाटू-नाटू’ या गाण्यावर अभिनेत्री हानिया आमिरने (Hania Aamir) डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. या चित्रपटाच्या कथानकाचं, चित्रपटातील गाण्यांचे आणि चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFX चं परदेशातील प्रेक्षकांनी देखील कौतुक केलं. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) हे गाणं लोकप्रिय ठरलं आहे. आता या गाण्याची क्रेझ पाकिस्तानात देखील दिसत आहे. नुकताच अभिनेत्री हानियाचा ‘नाटू नाटू’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिरचा (Hania Aamir) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हानिया ही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे.  या व्हिडीओमध्ये ती ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक केलं असून काही युझर्सनं या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 

हानियाच्या डान्सवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स | RRR Movie Craze In Pakistan

‘हा डान्स आहे की एक्सरसाइज सेशन, यात रिदम देखील नाही.’, अशी कमेंट एका नेटकऱ्यानं हानिया आमिरच्या व्हिडीओला केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, ‘हे काय आहे?’

कोण आहे हानिया आमिर? | Hania Aamir

हानिया आमिर ही पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. लोड वेडिंग, सुपरस्टार यांसारख्या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. तसेच तिला तितली, दिलरुबा, मेरे हमसफर या मालिकांमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.

‘आरआरआर’ (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली आहेत. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला. या गाण्यातील ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या डान्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here