रामदास आठवलेंच्या RPI ची ऐतिहासिक कामगिरी, नागालँडमध्ये 2 आमदार आले निवडून

0

कोहिमा,दि.2: रामदास आठवलेंच्या RPI ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागालँडमध्ये 2 आमदार निवडून आले आहेत. नागालँडमध्ये 60 पैकी 57 विधानसभेच्या जागांचे निकाल हाती आले आहेत. भाजपच्या युतीने चांगली आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपसह त्यांच्या सहकारी पक्षांनी 34 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर आहे. तर एनपीएफ दोन जागी आघाडीवर आहे. आतापर्यंत पाच जागांचे निकाल लागले आहेत. यात दोन जागा भाजपने तर दोन रामदास आठवले गटाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि एका जागी एनडीपीपीने विजय मिळवला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या इमतीछोबा यांनी तुनसंग सदर दोन विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यांनी एनडीपीपीचे उमेदवार के ओडिबेनडंग चांग यांचा 400 मतांनी पराभव केला. RPI आठवले गटाचे उमेदवार वाय लीमा ओनेने चांग यांनी नोकसेन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी एनडीपीपीच्या एच चूबा चांग यांना 188 मतांनी हरवलं. पहिल्यांदाच आरपीआयने नागालँडमध्ये निवडणूक लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दोन जागा जिंकल्या आहेत.

नागालँडच्या विधानसभेत 60 जागा असून याचे निकाल आज लागणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झालीय. सध्या नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजप युतीचे सरकार आहे. एऩडीपीपीने 40 तर भाजपने 20 जागा लढवल्या आहेत. 2018 च्या निव़डणुकीत भाजप एनडीपीपी युतीने एकूण 30 जागा जिंकल्या होत्या. या भाजपने 12 तर एनडीपीपीने 18 जागी विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 2018 मध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here