अहमदनगर,दि.7: महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले आहेत. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते. जास्तीत जास्त 5 ते 6 महिनेच हे सरकार टिकेल व मध्यावधी निवडणुका लागतील असे भाकीत शरद पवार यांनी केले. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही मध्यावधी निवडणुका लागतील असे भाकीत व्यक्त केले.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनेही मध्यावधी निवडणुका लागतील, असा दावा केला आहे. यानंतर आता मध्यावती निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी आता निवडणुका लागल्यास शिवसेनेचे 100 हून अधिक आमदार निवडून येतील, असा दावाही केला होता. यानंतर आता रोहित पवार यांनी आता निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या कर्जत दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यामांशी बोलत होते.
निवडणुका लागल्या – – –
निवडणुका लागल्या तर लढावे लागतीलच. मात्र, निवडणुका लागू नये, त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. तसेच एखाद्या विषय चिघळल्यानंतर तो कोर्टात गेला तर निवडणुका घ्याव्याच लागतील, त्यावेळी सर्वांत जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील. गेल्या निवडणुकात काही फरकाने पराभूत झालेले आमदार निवडून येतील, तसेच आमच्या आमदारांचे मताधिक्यही वाढलेले दिसेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.