स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा, चोरट्यांनी आख्खी तिजोरो केली साफ

0

बुलडाणा,दि.३०: स्टेट बँक इंडियावर दरोडा पडला आहे. बँकेवर दरोडा टाकण्याच्या घटनेत वाढ होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील केळवद (Kelwad) येथील स्टेट बँकेच्या (Robbery at State Bank) शाखेवर २० लाखाचा दरोडा पडल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडेनऊच्या वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. सकाळी बँकेचा शिपाई बँक उघडण्यासाठी आला आला असता ही बाब लक्षात आली. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

रात्रीच्या दरम्यान खिडकीचे गज वाकवून चोरटे बँकेत शिरले. गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी फोडली आणि त्या तिजोरीतून २० लाख ८१ हजार ५७५ रुपये चोरी करून पळ काढला. सकाळी शिपाई बँकेत आला, तेव्‍हा खिडकीचे गज वाकवलेले गेल्याचे पाहून त्‍याला चोरीचा संशय आला आणि त्‍याने बँकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.

स्टेट बँकेची शाखा केळवदमध्ये किन्‍होळा रोडवर आहे. अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करून तातडीने पोलिसांना कळवले. त्‍यानंतर पोलीस घटनास्‍थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कदम, बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे हेही घटनास्‍थळी आले आहेत. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने बँकेच्‍या बाजूच्‍या शेतापर्यंत माग काढला. तिथे दरोडेखोरांचे हँडग्‍लोज व बॅटरी मिळाली. सीसीटीव्‍हीत दरोडेखोर कैद झाल्याची शक्‍यता असून, सीसीटीव्‍हीचे फूटेज तपासले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here