Road Accident: बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

0

भोपाळ,दि.22: Road Accident: बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा येथे एक भीषण रस्ता अपघात (Terrible Road Accident) झाला आहे. बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 14 जणांचा दुर्दैवी (14 people died) मृत्यू झाला. रिवा इथं भीषण अपघात एकामागून एक तीन वाहनांची धडक झाली.अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील रिवा इथं हा अपघात घडला आहे. ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

अपघातात 12 जणांचा जागीच तर 2 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. दिवाळसणानिमित्त सिकंदराबाद इथून प्रवासी लखनऊला त्यांच्या घरी जात होते. दरम्यान बस रिवाच्या सोहागी डोंगरावर पोहोचली, त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रित सुटल्यानं ती ट्रकला धडकली आणि हा अपघात झाला.

या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केबिन आणि समोरच्या सीटवर बसलेल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. असे सांगण्यात येत आहे की तीन वाहने एकमेकांवर आदळली असून आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. ही बस हैदराबादहून लखनऊला जात होती.

ब्रेक न लागल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर अनेक जण बसमध्ये अडकले होते. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसऱ्या वाहनाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बस-ट्रक घटनास्थळी आहे, मात्र तिसरे वाहन फरार आहे. हे सर्व लोक दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आपापल्या घरी जात होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here