रियाझ अत्तारीला भाजपमध्ये होते जायचे, मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचण्याची सुरू होती तयारी

0

दि.3: आरोपी मोहम्मद रियाझ अत्तारीचा (Riyaz Attari) मोठा प्लॅन होता. सुनियोजित पद्धतीने देशात मोठं कांड करण्याचा प्रयत्न होता. टेलर कन्हैयालाल (Kanhaiya Lal) हत्याकांडातील आरोपी मोहम्मद रियाझ अत्तारी (Riyaz Attari) हा भाजपच्या राजस्थान अल्पसंख्याक आघाडीच्या बैठकींना जात असे. आता यामागचे कारण समोर आले आहे. उदयपूर कन्हैया लाल हत्याकांड (Udaipur Kanhaiya Lal Murder Case) अतिशय सुनियोजित पद्धतीने राबवण्यात आले. पाकिस्तानी हँडलर सलमान हैदर आणि अबू इब्राहिम यांच्या सांगण्यावरून, मोहम्मद रियाझ अत्तारीला भाजप अल्पसंख्याक आघाडीचा कार्यकर्ता बनायचे होते जेणेकरून त्याला आतील माहिती मिळू शकेल.

तपास एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, मोहम्मद रियाझ अटारी हा तीन वर्षांपासून भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून पक्षाच्या प्रमुख नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. पाकिस्तानात बसलेल्या सलमानने त्याला भाजपच्या सभांना जाऊन तिथून माहिती पाठवण्यास सांगितले होते. सुनियोजित प्लॅनिंग नुसार भाजपमध्ये प्रवेश करून रियाझ बड्या नेत्यांचा विश्वास जिंकणार आणि नंतर काही तरी मोठे कांड करणार, ज्यामुळे देशात खळबळ उडेल, अशी योजना होती.

हेही वाचा नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या; अजमेर दर्गा प्रमुख यांचं मोठं विधानं

तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान रियाझने सांगितले की, भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांना पक्षाशी जोडले होते. हे सर्व तो त्याच्या पाकिस्तानी हँडलर सलमानच्या सूचनेनुसार करत होता. मात्र त्याला फारसे यश मिळत नव्हते, कारण भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्यांनी त्याला मोठ्या बैठकीला बोलावले नाही. भाजपच्या कोणत्या मोठ्या नेत्यावर हल्ला करण्याची तयारी होती का? आता एजन्सीही याबाबत तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here