तुमच्या बँक अकाउंटला Fake Mobile App मुळे धोका

0

दि.१०: मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये अनेकजण मोबाईलमध्ये बरेचसे ॲप डाउनलोड करतात. कोरोना काळात अनेक लोक बँकेसह अनेक काम डिजीटल घरबसल्या करत आहेत. ऑनलाइन बँकिंगची सुविधा वाढत असताना, दुसरीकडे सायबर क्राइमची प्रकरणंही वाढत आहेत. खोट्या-बनावट, फेक ॲपमुळे अनेकदा सायबर क्रिमिनल्स लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे Fake Apps ची ओळख करणं गरजेचं आहे.

फेक Apps देखील अगदी खऱ्या App प्रमाणेच दिसत असल्याने अनेकदा युजर्सला त्याची ओळख करणं कठीण होतं. त्यामुळे फ्रॉडस्टर्स याचा फायदा घेतात आणि युजर्सचं अकाउंट खाली केलं जातं. फेक App ची ओळख करणं अतिशय गरजेचं असून यामुळे तुमचा फसवणुकीपासून बचाव होऊ शकतो.

असे ओळखा Fake Apps

  • तुमच्या फोनमध्ये कधीही थर्ड पार्टी साइटवरुन कोणतंही App इन्स्टॉल करू नका. फोनमध्ये नेहमी Google Play Store किंवा Apple App Store वरुनच App डाउनलोड करा. यामुळे फ्रॉड होण्याची शक्यता कमी होते.
  • Fake App मुळे फोनची बॅटरी अतिशय लवकर संपते. त्यामुळे फोन नवीन असला, तरी बॅटरी सतत कमी होत असेल, तर सतर्क व्हा. यामुळे मोबाइलमध्ये मालवेअर किंवा व्हायरस होण्याची शक्यता असू शकते.
  • कोणतंही App डाउनलोड करताना त्याचं स्पेलिंग तपासा. जर App च्या स्पेलिंगमध्ये गडबड वाटली तर ते App डाउनलोड करू नका. App च्या नावात एकही स्पेलिंग मागे-पुढे असेल, तर ते App फेक असल्याचं समजेल.
  • App डाउनलोड करताना ते किती वेळा डाउनलोड झालंय तेदेखील तपासा. एकाच नावाने अनेक App असतील, तर त्याच्या डाउनलोड्सकडे लक्ष द्या. यावरुनही App खरं की खोटं ते समजू शकतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here