धाराशिव,दि.25: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिकेत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या इच्छुक उमेदवारांची नावे कळवावीत, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 24 मार्च रोजी झालेल्या आंतरवली सराटी येथील मराठा समाजाच्या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाच्या वतीने 1000 उमेदवार न देता एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्येक मतदारसंघात एका उमेदवाराच्या नावाबाबत एकमत करून ही नावे मनोज जरांगे पाटील जाहीर करणार आहेत.
लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा किंवा अन्य समाजातील उमेदवाराचा विचार करताना त्याने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तसेच समाजाच्या प्रश्नासाठी दिलेले योगदान विचारात घेतले जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी किंवा त्यांच्या निकवर्तीयांनी नावे कळवताना समाजासाठी दिलेले योगदान, कार्य अहवाल सादर करावा,असे आवाहन सकल मराठा समजाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही नावे धाराशिव शहरातील सकल मराठा समाज संपर्क कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागे, Food Villa धाराशिव. येथे सकाळी 11 ते सायंकाळी पाच या वेळेत 29 मार्चपर्यंत अर्जासह आणून द्यावीत, त्यानंतर ही नावे जारंगे पाटील यांच्याकडे कळविण्यात येतील. त्यानंतर वरूनच नावे जाहीर केली जातील, असे सांगण्यात आले आहे.