‘केजरीवाल महिलांना घरी बोलावतात आणि …’, मुख्यमंत्री रेखा गुप्ता

0

नवी दिल्ली,दि.३: दिल्ली विधानसभेत आरोग्य विभागावरील कॅगच्या अहवालावर चर्चा करताना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) म्हणाल्या की, आम आदमी पक्षात कितीही कमतरता असल्या तरी एक चांगली गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाचे नेते शेवटी त्यांच्या चुका मान्य करतात.

गुप्ता म्हणाल्या, “आतिशी यांनी सभागृहात कबूल केले की त्यांच्या सरकारने चुका केल्या आहेत. आज केजरीवाल यांनी आतिशीला गोवले आहे आणि ते कुठे गायब झाले हे कोणालाही माहिती नाही.” 

महिलांना घरी बोलावतात आणि…

रेखा गुप्ता म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) महिलांना घरी बोलावतात आणि मारहाण करतात याबद्दल मला आतिशी यांची काळजी वाटते.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, “दिल्ली सरकारचा संपूर्ण आरोग्य विभाग आणि दिल्ली सरकारची रुग्णालये स्वतः आजारी आहेत. त्यांना प्रथम उपचारांची गरज आहे. ‘आप-दा’ च्या गेल्या १० वर्षात आरोग्याच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार झाला आहे. त्यांची काळी कृत्ये आता उघडकीस येत आहेत.”

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणल्याबद्दल आप आमदार जनरल सिंह यांना मार्शलनी बाहेर काढले. मुख्यमंत्री म्हणाल्या की, सभागृहात दोन अहवाल सादर करण्यात आले आहेत, परंतु विरोधक घाबरलेल्या स्थितीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here